Aurangabad Municipal
Aurangabad Municipal 
मराठवाडा

औरंगाबाद : सव्वाशे कोटींतून होणार 65 रस्ते 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सव्वाशे कोटींच्या शासन निधीतून करावयाच्या रस्त्यांच्या यादीवर अखेर पडदा पडला आहे. महिनाभरानंतर पदाधिकाऱ्यांनी यादी अंतिम केली असून, सुमारे 65 रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी (ता. सात) समोर आले. तांत्रिक मंजुरीनंतरच यादी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

शहरातील रस्त्यांसाठी शासनाने यापूर्वी महापालिकेला 24 व 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 24 कोटींच्या निधीतील कामे संपली असली तरी 100 कोटींच्या निधीतील रस्त्यांना निधी जाहीर झाल्यानंतर तब्बल 20 महिन्यांनी कामास सुरवात झाली. ता. तीन जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्त्यांचा नारळ फोडण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी सव्वाशे कोटींच्या निधीची घोषणा केली. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता रस्त्यांची यादी अंतिम करून ती शासनाकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, यादीवर नेहमीप्रमाणे शिवसेना-भाजपमध्ये वाद लागला. त्यामुळे यादी लांबणीवर पडली होती.

तीन दिवसांपूर्वी उपमहापौर विजय औताडे यांनी चिकलठाणा विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, रस्त्यांची यादी कुठे आहे?, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर यादी अंतिम करण्याच्या कामाला वेग आला. यादी अंतिम करण्याचे अधिकार महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आले होते. त्यांनी गुरुवारी (ता. सात) सांगितले, की सव्वाशे कोटींच्या निधीतून 65 रस्त्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. पीएमसीकडून तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच यादी शासनाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार तांत्रिक मंजुरीनंतर यादी लवकरात लवकर शासनाला पाठविण्यात येईल. 
 

रस्त्यांची नावे गुलदस्त्यात 
65 रस्त्यांमध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांसह वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांचादेखील समावेश आहे, असे महापौरांनी नमूद केले. रस्त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे यादी अंतिम करताना वशिलेबाजी झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT